Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
पिकअप ची महिलांना जोराची धडक एक जागीच ठार
पिकअप ची महिलांना जोराची धडक एक जागीच ठार

पिकअप ची महिलांना जोराची धडक एक जागीच ठार खर्डा गावामध्ये दुःखमय वातावरण
खर्डा प्रतिनीधी मच्छिंद्र येवले
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे रविवार दिनांक २७/४/२०२५ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना खर्डा-भूम रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ पीकअपने जोराची धडक दिल्याने स्मिता दिलीप रणभोर या महिलेचा जागीच मृत्यू झाला, वर्षा प्रकाश दिंडोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना अहिल्यानगर येथे उपचारा साठी पाठवण्यात आले आहे.
अपघातानंतर पिक अप चालकाने जामखेड कडे पलायन केले. खर्ड्या चे सहायक पोलिस निरीक्षक विजय झंझाड यांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासाचे चक्रे फिरवून वाहनाचा तपास लावला मिरजगाव येथून पिक अप वाहनासह ताब्यात घेतले.