सभापती माननिय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर निधी वाटप*
सभापती माननिय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर निधी वाटप*

सभापती माननिय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर निधी वाटप
अहिल्यानगर प्रतिनिधि रमेश धोत्रे
मिरजगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर येथील मिरजगाव प्रभाग व कोरेगाव प्रभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गट व ग्रामसंघांचा समुदाय गुंतवणूक निधी वाटप मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते 1 कोटी ,76 लाख, 40 हजार रूपयाचा निधी वाटप करण्यात आला.
यावेळी विशेष दिव्यांग व विधवा भगिनी यांच्या बचत गटांना सदर समुदाय गुंतवणूक निधी वाटपासाठी प्राधान्य देण्यात आले.
या उपक्रमातून महिलांच्या आर्थिक सक्षमतेस बळकटी देत त्यांना स्वावलंबन, उद्यमशीलता, सामूहिक व आर्थिक साक्षरतेकडे नेणारा सकारात्मक टप्पा साध्य होत आहे. महिला बचत गट ही केवळ आर्थिक गटा पुरती मर्यादित नसून, ती सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि सामर्थ्याच रूप आहे. या निधीच्या माध्यमातून गावोगावी नव्या संधी उभ्या राहतील, कौशल्य विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक उत्पादनांचे मूल्यही वाढेल.
याप्रसंगी प्रांत श्री.नितीन पाटील, प्रकल्प संचालक श्री.राहुल शेवाळे, गटविकास अधिकारी श्री.रूपचंद जगताप, जिल्हा व्यवस्थापक श्री.सोमनाथ जगताप, तहसीलदार श्री.गुरू बिराजदार यांच्यासह श्री.काकासाहेब तापकीर, श्री.अशोक खेडकर, श्री.परमवीर पांडुळे, श्री.शहाजीराजे भोसले, श्री.शेखर खरमरे, श्री.मंगेश जगताप, श्री.नंदकुमार नवले, श्री.सचिन पोटरे, श्री.नितीन खेतमाळीस, ऍड.प्रतिभाताई रेणुकर, सरपंच सौ.सुनिताताई खेतमाळीस, मनीषा मोहोळकर . सुजाता झरेकर,आरती थोरात, मनिषाताई फडतरे, .आशाताई वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.