वाशिम ते रिसोड रस्त्यावर रिठद गावाजवळील येवती फाट्यावर अपघात.
वाशिम ते रिसोड रस्त्यावर रिठद गावाजवळील येवती फाट्यावर अपघात.

वाशिम ते रिसोड रस्त्यावर रिठद गावाजवळील येवती फाट्यावर अपघात.
रिसोड प्रतिनिधी धनंजय माळेकर
वाशिम ते रिसोड रस्त्यावर गावाजवळ येवती फाट्यावर आयशर ट्रकचा अपघात झाला असून हा अपघात गाय आडवी आल्याने ती गाय वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाईचे कोणतेही नुकसान या अपघाताने झाले नाही पण ट्रकचे मात्र नुकसान झाले या रस्त्यावर ट्रक आडवा झाला हा ट्रक येवता तालुका रिसोड येथून टमाटे भरून आदिलाबाद चालला होता. परंतु अचानक गाय आडवी आल्याने ट्रकचे ब्रेक दाबून थांबवण्याचा प्रयत्नात आयशर ट्रक पलटी झाला. व ब्रेक लाइनर चिपकले त्यामुळे हा अपघात घडला.या आयशर ट्रक चा नंबर T S 21 T 88 77 आहे. ट्रक चालक व क्लीनर यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र आयशर ट्रक व टमाट्याचे संपूर्णतः नुकसान झाले आहे. ट्रकचा समोरील काच फुटून चालक व क्लिनर बाहेर पडले.अपघाताची वेळ दि.२ एप्रिल २०२५ ला सायंकाळी 05:30 मी. अपघात घडला. रिसोड प्रतिनिधी धनंजय माळेकर महाराष्ट्र मीडिया न्यूज रिसोड