Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
बैलगाडा बंदी विरोधातील आंदोलकांची निर्दोष मुक्तता
२० वर्षापासूनंच्या लढयाला आले यश

बैलगाडा बंदी विरोधातील आंदोलकांची निर्दोष मुक्तता.
२० वर्षापासूनंच्या लढयाला आले यश.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वर घातलेली बंदी उठविण्यासाठी मंचर येथे २० वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनात अनेकांवर गुन्हे दाखल झालेले होते त्यात माजी खासदार कै. किसनराव बाणखेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सह अनेक शेतकरी बैलगाडा प्रेमी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते त्याचा निकाल खेड सत्र न्यायालयाने ६७ आदोंलकांना निर्दोष मुक्त केले त्या निमित्ताने आज लांडेवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले तसेच या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या शेतकरी व बैलगाडा प्रेमींनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पेढा भरून आनंद साजरा केला.