देव दगडात नाही तर तुमच्या आमच्या देहात आहे – वसमतकर महाराज
देव दगडात नाही तर तुमच्या आमच्या देहात आहे - वसमतकर महाराज

देव दगडात नाही तर तुमच्या आमच्या देहात आहे – वसमतकर महाराज
***************
आनंद दत्त आश्रम माहूर येथील साईनाथ वसमतकर महाराज हे मागील बरेच वर्षापासून लोकांना किर्तनातून उपदेश देत हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवितात.त्यांच्या या कामाची पावती म्हणून स्वच्छता दूत म्हणून शासनाने नुकतीच निवड केली तेव्हा पासून वसमतकर महाराज हे राष्ट्र संताचा स्वच्छातेचा विचार घराघरात . पोहोचविण्याचे काम करत आहे असे रमेश बद्दीवार यांच्या फार्म हाऊसवर पत्रकारांशी बोलताना सांगितले. समोर म्हणाले मी कोणताही साधू संत नाही मी एक स्वच्छता दूत म्हणून लोकांच्या मनातले अंधश्रध्दा व त्यांच्या परीसराबरोबरच त्यांच्या डोक्यातील कचरा साफ करणारा साधारण व्यक्ती आहे. देशात एवढी भयानक अंधश्रद्धा पसरली आहे लोकांना देव कुठे आणि दगड कुठे यांचे भानही राहीले नाही.
देव दगडात नसून ते तुमच्या आमच्या देहात वसलेले आहे खर्रा देवाची ओळख करा असेही यावेळी महाराजांनी सांगीतले. दगडाच्या देवावर पाणी टाकून वाया घालवण्यापेक्षा तोच पाणी एखाद्या तहालेल्यांना पाजा किंवा एखाद्या वृक्षाला टाका ते तरी तुम्हाला भरभरून आर्शिवाद देतील.
देशात पित्रा म्हणून एक अंधश्रध्दा बाळगली जाते त्यात कावळ्यांना लाडू चारण्याची परंपरा आहे पक्षावर प्रेम जरूर करा अन्न खायाला टाका. पण जिंवतपणीच आई वडीलांची सेवा करा तेच खरे देव आहे. कावळ्यात बाप पाहू नका.
तूमचा भविष्य पाहण्यासाठी तुम्ही ज्योतीषीकडे जाता पण तुम्हीच सत्य असाल तर तुम्ही स्वताच भविष्य उज्ज्वल करू शकता तुम्हाला कोणत्याही ज्योतीषीकडे भविष्य पाहण्याची गरज नसल्याचे सांगितले
देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. भारत पाकिस्तानच्या तणावा दरम्यान मी वाघा बॉर्डरच्या सिमेवर स्वच्छता अभियान राबवत सात दिवसाचा सप्ताह केला तिथच्या काही लोंकाचा विरोध होता तरी पण मी माझे मोहीम सुरूच ठेवले आणि माझ्या किर्तनाला समर्थन देत विरोध करणारेही कार्यक्रमाचे आनंद घेत माझी भव्य मिरवणूकीत सामील झाले त्यात सैनिक ही मोठ्या प्रमाणात होते.
या ठिकाणी किर्तन करण्याचा मूख्य उद्देश म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणे हेच होते असेही यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत साईनाथ महाराज वसमतकर यांनी सांगीतले. या वेळी उद्योजक जवाहर जयस्वाल, बंडू पाटील, रमेश बद्दीवार’ पत्रकार बांधव व महाराजांचे भक्तगण उपस्थीत होते.
प्रतिनिधी : भारत राठोड किनवट