Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
खेड वनविभागाची धडक कारवाई , अवैध लाकुड व्यावसायिकांना दनका
खेड वनविभागाची धडक कारवाई , अवैध लाकुड व्यावसायिकांना दनका

खेड वनविभागाची धडक कारवाई ,
अवैध लाकुड व्यावसायिकांना दनका.
राजगुरुनगर, महाराष्ट्र मिडीया टिव्ही चॅनेल प्रतिनिधी विजयकुमार जेठे -:गुरुवार दिनांक ८/५/२५रोजी. संधयाकाळी ५:30 च्या दरम्यान अमूल डेअरी चांडोली ता खेड येथे अवैध लाकुड वाहतूक करताना एक संपूर्ण जळावू लाकडांंनी भरलेले वाहन गोपनीय माहिती मिळाल्यानुसार खेड वन विभागाने ताब्यात घेतले, हि कारवाई जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उप वनसंरक्षक अमृत शिंदे याच्यां नेत्रूत्वाने तसेच खेड वनपरिक्षेत्र अधिकारी यादवराव जाधव सो वनपरीमंडल अधिकारी जी. टी. मुके,सागर तांबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रसंगी सहायक वन संरक्षक अमृत शिंदे यांनी वन विभागाच्या वतीने बेकायदा वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी सर्व नागरीकांना जाहीर अवाहन केले.