क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना कार्यकारणी
क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना कार्यकारणी

क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना कार्यकारणी
मंगरुळपीर
आदिवासी बांधवांसाठी कार्यरत क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटनेचे ची मंगरुळपीर कार्यकारणी घोषित करण्यात आली.
स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित सभेमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर वायले यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश सदस्य सुनील मालपाणी यांचेसह सामाजिक कार्यकर्ते सतीश राठी, सुनील भुतडा, संघटना जिल्हा अध्यक्ष रवी पाखमोडे आदिवासी समाजातील जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष युवराज पवार व शहर अध्यक्ष पदावर गुलाब वायले यांची तर तालुकाउपाध्यक्ष तुलसीदास घोंगडे यांचा समावेश आहे.
यावेळी कैलास राऊत, सुभाष चौधरी, सदानंद गेडाम, ललित वाघमारे, निलेश खोडके आदी सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
Photo