मार्कण्डेय मूर्तीप्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात मांडवी नगरीचे वातावरण झाले भक्तीमय
मार्कण्डेय मूर्तीप्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात मांडवी नगरीचे वातावरण झाले भक्तीमय

मार्कण्डेय मूर्तीप्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात मांडवी नगरीचे वातावरण झाले भक्तीमय
(बाल ब्रम्हचारी मनू महाराज यांच्या हस्ते पार पडले कलशारोहनाचा कार्यक्रम)
पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या ऋषी मार्कण्डेय मंदीर मांडवीच्या प्रकाश नगरात बांधलेले आहे. त्या मंदीराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहनाचा कार्यक्रमाचे आयोजन येथील पद्मशाली समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा व कलशारोहनाचे कार्यक्रम सतत तिन दिवस चालले दि. 2 रोजी मांडवीनगरीत प्रभातफेरी काढण्यात आली त्या फेरी मध्ये सर्वच माता भगिणींनी पिवळ्या रंगच्या वस्त्र परिधान केल्या होत्या त्यामूळे ती रॅली भाविकांना आकर्षीत करत होती व समोर शिव मार्कण्डेय भगवानचे पालखी आणि रॅलीच्या मागे भजन कीर्तन चालू असल्याने सर्व मांडवी शहरात भक्तीमय वातावरण पसरले होते. त्या प्रभात फेरीत पद्मशाली समजाच नव्हेतर इतर हिन्दू बांधवही प्रामुख्याने भाग घेतले होते.
दि.३ रोजी होमहवनाचा कार्यक्रम पार पडला तर दि. ४ तारखेला महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्कण्डेय चौक नामफलकाचे आनावरण आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात श्रीमती बेबीबाई प्रदीप नाईक, श्रीमती सुमनबाई पेंदोर, सरपंच मांडवी अशोक विठ्ठलराव श्रीमनवार, हेमंत पाटील आमदार विधानसभा परिषद नांदेड, आनंद मच्छीवार,माजी नगराध्यक्ष किनवट सरोज कार्तिक चव्हाण, उपसरपंच मांडवी बाबूसिंग नाईक, पांडूरंग कारभारी, यासह हजारो पद्मशाली हिंदू बांधव उपस्थित होते.हा तीन दिवसीय कार्यक्रम नियोजनबद्ध झाल्याने पद्मशाली समाजाचे अध्यक्ष गजानन बंडेवार यांनी सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्र मिडीया किनवट प्रतिनिधी भारत राठोड