महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टी.डी.एफ.) चे राज्यस्तरीय शिक्षक अधिवेशन
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टी.डी.एफ.) चे राज्यस्तरीय शिक्षक अधिवेशन

श्री. मुरलीधर मांजरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टी.डी.एफ.) चे राज्यस्तरीय शिक्षक अधिवेशन २०२५ पालघर या ठिकाणी आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे साहेब यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण व श्री विठ्ठल रखुमाई शिक्षण प्रसारक मंडळ, मांजरेवाडी ता. खेड येथील संस्थेचे सचिव, सुप्रसिद्ध निवेदक – मुरलीधर मांजरे यांना शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक उत्कृष्ट कार्याबद्ल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – मा. राज्यमंत्री व पालघरचे आमदार. मा. राजेंद्र गवित यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार निरंजन डावखरे, मा. आ. राजेश पाटील, टीडीएफ राज्याचे अध्यक्ष जी. के. थोरात, कार्याध्यक्ष नरसू पाटील, कार्यवाह के. एस. ढोमसे, पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी संगिता भागवत, एबीपी माझा चे जेष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार स्विकारला.
श्री. मांजरे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान दिले. त्यांनी विविध उपक्रम राबविले. गेली २८ वर्ष ते माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ चे माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. आंदोलने, मोर्चा यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. शासन दरबारी त्यांनी अनेक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच ते विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी आहे. त्यांनी नाटके, लेख, कविता यांचे लेखन केले असून विविध वर्तमान पत्रामधून प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांना आतापर्यंत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य,राष्ट्रीय स्तरावर एकूण ७१ पुरस्कार, परितोषिके प्राप्त झाले आहेत.त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.