Uncategorized
मराठा – ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात
मराठा - ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार : शरद पवार
राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा मुद्दा तापलेला आहे यावर शरद पवार यांनी महतवाची भूमिका मांडली, मी राज्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे असे शरद पवार म्हणाले, सध्या संपूर्ण राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा तापलेला आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे, तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे, या सर्व पेचप्रसंगावर शरद पवार यांनी तोडगा काढावा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जात आहे यावर जालना, बीड यासारख्या जिल्ह्यात अस्वस्थता आहे संसदचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे.