स्वामी विवेकानंद वाचनालयात माजी सैनिकांचा सत्कार करुन कारगिल विजय दिवस साजरा.
स्वामी विवेकानंद वाचनालयात माजी सैनिकांचा सत्कार करुन कारगिल विजय दिवस साजरा.
रिसोड /प्रतिनिधी :-स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात 26 जुलै ला कारगिल विजय दिवस शहरातील माजी सैनिकांचा सत्कार करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक हरिगीर गिरी व वसंतराव ताकतोडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यकर्माची सुरुवात करण्यात आली.प्रसंगी देशसेवा करुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविककरताना माजी सैनिक जगन्नाथ ठोंबरे यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी सांगितली.57 भारतीय जवानांनी प्राणाची आहुती देत ते युद्धात शहीद झाले तर 1400 सैनिक जखमी झाले.भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी ही पुढील पिढीला प्रेरित करणारी असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. मराठा सेवा संघांचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कव्हर यांनीही कारगिल युद्धतील शहीदांना अभिवादन करून सैनिकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर शासकीय कार्यालयात लहानमोठया कामासाठी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल खंत व्यक्त केली व भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी मराठा सेवा संघ इतर सामाजिक संघटना च्या सहकार्याने शासनदरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन रवि अंभोरे यांनी तर आभार प्रा.कमलाकर टेमधरे यांनी मानले. प्रसंगी माजी सैनिक उद्धवराव गरकळ, तेजराव धामोडे, जगन्नाथ ठोंबरे,वसंतराव ताकतोडे,हरिगीर गिरी, शंकरराव पैठणकर, बबनराव वाघ, नागरे इत्यादी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.