येरोळ येथे कु.मन्मथ बालाजी येरोळकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत संपन्न…
येरोळ येथे कु.मन्मथ बालाजी येरोळकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत संपन्न...
येरोळ येथे कु.मन्मथ बालाजी येरोळकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत संपन्न…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी:नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे दि.२७ जुलै २०२४ रोजी वारकरी संप्रदायातील नावाजलेले किर्तनकार बालाजी महाराज येरोळकर यांचे चिरंजीव मन्मथ यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील तसेच सर्वदूर असलेल्या दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी गणेश स्वामी महाराज यांनी आशिर्वाद रुपी महात्मा बसवेश्वर महाराज, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज, अशा अनेक गुरुवर्यांच्या विचारांचे संस्कार करत आशिर्वाद दिला. तसेच त्यावेळी ना.संजय बनसोडे यांनी मन्मथ बाळास आशिर्वाद दिला व मन्मथ बाळाचा जन्म हा पंचक्रोशीतील जागृत देवस्थान शंभू महादेव या ठिकाणी होत असलेल्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी जन्म झाला म्हंजे बाळावर ईश्वर रूपी आशिर्वाद सुध्दा मिळाला आहे असे सांगितले, त्या बरोबरच त्यांनी आपल्या जीवनातील काही घडामोडी जनतेसमोर मांडताना दिसले, की निलंगा मतदार संघ माझे कार्यक्षेत्र नसताना ही माझी या ठिकाणी लोकप्रियता वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे फक्त फक्त येथील मनमिळाऊ स्वभावाची जनता मी या ठिकाणी भरपूर येऊन गेलोय परंतू एक कार्यकर्ता म्हणून परंतू या वेळी आलोय मंत्री म्हणून हे फक्त आपण जनतेनी दिलेल्या मत रूपी आशिर्वादामुळे तसेच काही लोक माझ्याबद्दल चूकीची अफवा पसरवत आहेत त्याकडे लक्ष न देता सदैव माझ्या सोबत असाच आशिर्वाद रहावा असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपचे युवा नेते रामेश्वर चावरे यांनी केले तसेच मंचावरील सर्वांनी मन्मथ बाळास आशिर्वाद देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. तद्नंतर निलंगा मतदार संघाचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही या सोहळ्यास उपस्थिती लावली होती, त्यांच्या पुढील नियोजीत कार्यक्रमास जाण्यास वेळ कमी असल्या कारणाने वेळात वेळ काढून मन्मथ बाळास आशिर्वाद दिला. या सोहळ्यास ना. संजय बनसोडे, आ.संभाजी पाटील निलंगेकर, शिवराज नावंदे गुरुजी, राजेश्वर स्वामी लाळीकर महाराज,उमाकांत बोळेगावे, येरोळ गावचे सरपंच सुकुमार लोकरे, उपसरपंच सतिष शिंदाळकर,बालाजी महाराज येरोळकर व त्यांचे परिवार, भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, भाजपचे नेते धनराज चावरे, भाजपचे युवा नेते अमर माडजे,शिवानंद भुसारे,राम सुमठाणे,अब्दुल मुजेवार,राम पाटिल, श्याम शिंदाळकर,राजकुमार शिंदाळकर, तुकाराम पाटील, प्रभाकर चोचंडे, रत्नाकर शिंदाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी बाबुराव वाघमारे, विनोद लोंढे, बालाजी झटे,नागेश साकोळकर, नितेश झांबरे तसेच समस्थ गांवकरी मंडळी या सोहळ्यास उपस्थित होते व सर्वांनी मन्मथ बाळास आशिर्वाद दिला व तसेच सोहळा संपन्न झाल्यानंतर भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती त्याचा सर्वांनी आनंदाने आस्वाद घेतला.