पिंगळाक्षी मंदिर संस्थान रस्त्याच्या कामाची उद्घाटन आमदार भावना ताई गवळी
पिंगळाक्षी मंदिर संस्थान रस्त्याच्या कामाची उद्घाटन आमदार भावना ताई गवळी
*पिंगळाक्षी मंदिर संस्थान रस्त्याच्या कामाची उद्घाटन* आमदार भावना ताई गवळी
माजी आमदार एडवोकेट आमदार विजयराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन आज पार पडले उद्घाटन प्रसंगी माजी खासदार आमदार भावना गवळी म्हणाल्या
सिमेंट काँक्रीट रोड मुळे पिंगलाक्षी देवीच्या भक्तांची गैरसोय दूर होईल भावनाताई गवळी यांनी केले त्या श्री पिंगलाक्षी देवी मंदिर येथील पन्नास लाख रुपये च्या सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या
पिंगलाक्षी देवी संस्थान येथील 50 लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून माजी आमदार एडवोकेट विजयराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला सिमेंट रोडचे भूमिपूजन आमदार भावनाताई गवळी यांचे हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते माजी आमदार ऍड विजयराव जाधव होते.प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगवानराव क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे , पिंगलाक्षी देवी संस्थानचे संचालक संतोष वाघमारे,गजानन पांडे,मनीष बगडिया, उपस्थित होते. पुढे बोलताना भावनाताई गवळी म्हणाल्या की पिंगलाक्षी देवी संस्थान हे जागृत संस्थान असून या परिसरा चे सौंदर्यीकरण करणार आहे पिंगलाक्षी देवी संस्थानला मी 20 लक्ष रूचा निधी दिला असून संस्थान सांगेल ते काम मी त्या 20 लक्ष रुपयांमधून करणार आहे. आपल्या अध्यक्षक्षीय भाषणात माजी आमदार विजयराव जाधव म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकार ने 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. आज पन्नास लक्ष रुपयांच्या भूमिपूजन प्रसंगी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याने मला आनंद झाला आहे.यापुढे सुद्धा आमदार भावनाताई गवळीच्या माध्यमातून पिंगलाक्षी देवीच्या परिसरासह रिसोड मतदार संघाचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगवानराव क्षीरसागर यांचेही समायोजित भाषण झाले. पिंगलाक्षी देवी संस्थान तर्फे आमदार भावनाताई गवळी,माजी आमदार एडवोकेट विजयराव जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवानराव क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत वसमतकर यांनी संचालन नंदकिशोर मगर तर आभार प्रदर्शन डिगंबर जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला नारायणराव सानप भाजपाचे लखनसिंह ठाकूर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सानप राष्ट्रवादीचे नेते अंकुशराव देशमुख भाजपाचे सरपंच भारत भाऊ नागरे, कैलास महाजन सोमनाथ आप्पा खके,बबनराव सुरूशे, विठ्ठलराव नरवाडे, जयंत वसमतकर सर भागवतराव गवळी, शिवसेना शहराध्यक्ष अरुण मगर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अरुण क्षीरसागर,कैलास महाजन,सुनील बेलोकार, ,सुनील खके, दामोदर गरड अस्तरकर महाराज गोपाल जाधव, डि के सदार, राम बोरकर,राम जाधव, नितेश राठी,अजिंक्य जाधव आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.