महाराष्ट्र ग्रामीण

शेतकऱ्यांना बँकेतील खाते मिनीमम बॅलेंन्स व बेबाकी प्रमाणपत्राला आकारलेले शुल्क रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मुख्य शाखेस मागणी

शेतकऱ्यांना बँकेतील खाते मिनीमम बॅलेंन्स व बेबाकी प्रमाणपत्राला आकारलेले शुल्क रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मुख्य शाखेस मागणी

शेतकऱ्यांना बँकेतील खाते मिनीमम बॅलेंन्स व बेबाकी प्रमाणपत्राला आकारलेले शुल्क रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मुख्य शाखेस मागणी

लातूर प्रतिनिधि :

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने त्यांच्या खातेदारांना मिनीमम बॅलेंन्स दोन हजार रुपये ठेवणे बंधनकारक केले आहे.तसेच शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारणी करण्याचे परिपत्रकही काढले आहे.यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे.याविरोधात आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने बॅंकेचे कार्यकारी संचालकांची भेट घेऊन हे निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारे असल्याने ते रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बॅंक म्हणुन ओळखली जाते.आणी बॅंकेचे चेअरमनही तसेच सांगतात.परंतु हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये खात्यात जमा ठेवण्याचा निर्णय घेऊन,शेतकऱ्यांचे पैसे अडकवून ठेवले जात आहेत. एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून चार महिन्याला एकदा दोन हजार रुपये तुटपुंजी रक्कम देत आहे.तर दुसरीकडे जिल्हा बॅंक चार महिन्याला एकदा मिळणारे दोन हजार खात्यात जमा ठेवण्याची सक्ती करत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे असल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

तसेच शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेबाकी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, ते मिळवण्यासाठी शेतकरी बॅंकेकडे गेले असता बॅंकेचे शाखा व्यवस्थापक एक परिपत्रक दाखवून शेतकऱ्यांना सुमारे दोनशे ते अडीचशे रुपयांचे चलन भरल्यानंतरच बेबाकी प्रमाणपत्र मिळेल असं सांगत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांची बॅंक म्हणुन सांगायचे आणि त्याच शेतकऱ्यांना देणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी शेकडो रुपयांचा भुर्दंड लावायचा हे अत्यंत चुकीचे असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हे दोन्ही निर्णय रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकारी संचालक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष वसंत कंदगुळे, तालुकाध्यक्ष समाधान क्षिरसागर,जेष्ठ नेते राजाराम पाटील,मलकु पाटील, रामदास गिरी, युवा नेते नितेश झांबरे, दत्ता मुगळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button