श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या सदस्य पदी अर्जुन जाधव यांची निवड.
श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या सदस्य पदी अर्जुन जाधव यांची निवड.
श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या सदस्य पदी अर्जुन जाधव यांची निवड.
लातूर प्रतिनिधि :
निलंगा तालुक्यातील अर्जून जाधव यांच्या समाजसेवेची दखल घेत यांची श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा गेल्या 75 वर्ष म्हणावा तसा विकास झाला नाही आजही वाडी तांड्यावर मूलभूत सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तांड्यातल्या ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवल्याशिवाय या गावाचा विकास होऊ शकत नाही ही बाब बंजारा समाजाच्या लक्षात आली असल्याने गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्या या पद्धतीने मागणी केली होती यावर शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना ची नव्याने निर्मिती केली आहे.
या योजनेच्या सदस्य पदी अर्जुन शिवाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो परंतु त्या समाजाचा मनावा तसा विकास झालेला नाही, आज ही अनेक तांड्यावर पिण्यासाठी पाणी नाही, लाईट नाही स्मशान भूमी नाही अश्या अनेक समस्या तांड्यावर आहेत, कोण-कोणत्या मूलभूत सुविधा नसल्याने यातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर बंजारा समाजाच्या वतीने शासनाकडे व ग्रामसभेकडे या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतच्या दर्जा द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. महायुतीच्या सरकारने बंजारा समाजाला विविध माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. बंजारा समाजाची काशी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी स्थळ भारतातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भामध्ये भरीव निधी दिला असून मंदिर पुनर्निर्मान चे काम सुरू आहे.
श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेचे नव्याने स्थापन करून बंजारा समाजाला या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे.
या योजनेच्या माध्यमातून पुढील काळात चांगले काम होणार आहे.
जिल्हास्तरावर तांड्यांना मूलभूत सुविधा पुरविणे त्याचबरोबर बंजारा लमान तांड्यांना महसूल दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याचे काम ही समिती करणार आहे या समितीवर महाराष्ट्रातील १४० बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी हे राहणार असून कार्यकर्ते हे अशासकीय सदस्य म्हणून राहणार आहेत यात लातूर जिल्ह्यातून निलंगा तालुक्यातील दापका तांडा येथील रहिवाशी अर्जुन शिवाजीराव जाधव व उदगीर तालुक्यातील मल्लापुर तांड्यातील पवन बाबुराव चव्हाण यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या झालेल्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.