जिल्हा परिषद प्रशाला येरोळ शाळेस कुलकर्णी कुटुंबियांकडून शालेय साहित्य वाटप..
जिल्हा परिषद प्रशाला येरोळ शाळेस कुलकर्णी कुटुंबियांकडून शालेय साहित्य वाटप..
जिल्हा परिषद प्रशाला येरोळ शाळेस कुलकर्णी कुटुंबियांकडून शालेय साहित्य वाटप...
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला येरोळ येथिल शाळेचे माजी विद्यार्थी येरोळ गावचे सुपुत्र पद्माकर निळकंठराव कुलकर्णी यांचे चिरंजीव अभिलाष पद्माकर कुलकर्णी हे अमेरिकेतील गूगल या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर या पदावर कार्यरत आहेत तर त्यांनी आपले वडील ज्या शाळेत शिकले त्या शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी करण्याची इच्छा आहे , अश्या प्रकारची इच्छा व्यक्त केली असे कुलकर्णी कुटुंबियांचे मिञ जिजामाता विद्यालयाचे प्रा.अभय येरोळकर यांनी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना सांगितले, तसेच अभिलाष कुलकर्णी यांनी लगेच कौटुंबीक मिञ प्रा.अभय येरोळकर यांच्या माध्यमातून ५०,००० हजार रुपयाचे शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये २०,००० हजार रुपयांचे स्टडी टेबल, १५,००० रुपयांचे १० फॅन, १०,००० रुपयांचे साऊंड सिस्टीम संच त्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना ५००० रुपयांचे शैक्षणिक साहित्य ही त्यांनी शाळेला दान दिले. या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक डी.एन.निचळे, व प्रमुख पाहुणे म्हणून येरोळ गावचे माजी सरपंच प्रा.अभय येरोळकर , रमेश दिवाणजी कुलकर्णी, ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रभाकर चोचंडे, मोहन गंभीरे, मतिसागर कंदीले, राजेंद्र साकोळकर, नंदू पाटील, नंदकिशोर साकोळकर, शादुल मुजेवार, शालेय समितीच्या उपाध्यक्षा शिल्पा पाटील,उद्धव वाघमारे,पत्रकार नितेश झांबरे व प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शेख यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक निचळे डी.एन यांनी मानले व या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी पालक व गावकरी मंडळी उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कुलकर्णी कुटुंबीयांचे आभार मानले व त्यांच्या या शालेय साहित्य वाटपाच्या मौलिक कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक ही होताना दिसून आले.