भाजप पक्षाच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य
भाजप पक्षाच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य
खंडाळा पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत यादव यांनी आत्तापर्यंत खंडाळा तालुक्यातील पळशी गण विभागात येणाऱ्या गावात विविध ठिकाणी जनतेची सेवा करत असताना लोकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन गरजातील महत्त्वाच्या प्रमुख गोष्टींकडे लक्ष देऊन भाजप पक्षाच्या वतीने जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य
केलेले आहे हे लोकांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे त्यांनी लोकांसाठी शेततळी तयार केली जनतेला घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी नळसेवा पुरवली त्यांच्या कार्यात त्यांनी लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला तसेच रोजगार हमीचाही लाभ दिला आहे अशा विविध कामांची यादी व त्यांच्या कार्याची पोचपावती सामान्य जनतेने आपल्या प्रतिक्रियातून दिलेली आहे व असा विश्वास देखील दिला आहे की चंद्रकांत यादव साहेबांनी पुन्हा एकदा वरच्या स्तरावर जाऊन संपूर्ण तालुक्यातील नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे कार्य करावे व त्यांना त्यांच्या कार्यानुसार पक्षाने देखील वरच्या पातळीवर संधी द्यावी अशी लोकांची भावना आहे खंडाळा प्रतिनिधी महाराष्ट्र मीडिया टीव्ही