Uncategorized

दौंडमध्ये यंदा बदल घडवायचा आहे – शरद पवार

दिग्विजय जेधे यांनी दौंड जनसंवाद पदयात्रेचा अहवाल शरद पवार यांच्या समोर केला सादर

दौंडमध्ये यंदा बदल घडवायचा आहे – शरद पवार

 

दिग्विजय जेधे यांनी दौंड जनसंवाद पदयात्रेचा अहवाल शरद पवार यांच्या समोर केला सादर !

 

महाराष्ट्र मीडिया न्यूज रिपोर्टर ‘दिपक पवार’

दौंड, ता.१ : दौंड तालुक्यातील १०० हून अधिक गावांत ३५० किमीपेक्षा अधिकचे अंतर पायी चालत दिग्विजय जेधे यांनी सहकाऱ्यांसह जनसंवाद पदयात्रेद्वारे सर्वसामान्य नागरिकांशी १ ते १३ ऑगस्ट दरम्यान संवाद साधला व जनसंवाद अहवाल शरद पवार यांच्या समोर दिग्विजय जेधे यांनी सादर केला.

यावेळी शरद पवार यांनी म्हणाले की, दौंड जनसंवाद पदयात्रा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून दिग्विजय जेधे यांनी पायी चालत दौंड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढल्यामुळे आपल्या पक्षाचा विचार सर्वदूर पोचत आहे. तुम्ही स्वयंस्फूर्तीने काढलेल्या या पदयात्रेमुळे पक्षाचे चिन्ह व विचार घरोघरी पोहचत आहे.

दिग्विजय जेधे म्हणाले की, शरद पवार यांचे हे शब्द मला नेहमीच प्रेरणा देत राहतील. ८४ वर्षांच्या योद्ध्याचे आशीर्वाद लाभले आणि आमच्या कष्टाचे चीज झाले. आज मी माझ्या काही सहकाऱ्यांसह सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दौंड जनसंवाद पदयात्रेचा अहवाल आणि देशभक्त केशवराव जेधे यांचे चरित्र त्यांच्या हाती सुपूर्द करत १ ते १३ ऑगस्ट या कालावधीत ३५० किमी चालत केलेल्या पदयात्रेची माहिती मी त्यांना दिली. दौंड विधानसभा मतदारसंघ गेल्या १०-१५ वर्षांपासून गटातटाच्या राजकारणाने त्रस्त आणि भकास झाला आहे. रस्ते, वीज, पाणी, रोजगार, महिला सबलीकरण अशा अनेक विषयांत हा तालुका अत्यंत पिछाडीवर आहे. तालुक्यात बेरोजगार युवकांच्या फौजा पडून आहेत. लोक खूप अस्वस्थ आहेत आणि ते विधानसभेला तुतारीच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराला विजयी करून शरद पवार यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी सज्ज असल्याचे मी त्यांना सांगितले. विधानसभेला तुमच्या नेतृत्वात आम्ही तुतारी चिन्हावर लढणारा उमेदवारच विजयी करू, असा निर्धार आम्ही व्यक्त केला. त्याच त्या चेहऱ्यांना दौंडमधील जनता आता वैतागली असून, तालुक्याला आता तिसरा नवीन चेहरा पाहिजे. आता हवा बदल नवा, अशी मागणी होताच शरद पवार यांनी या मागणीला दुजोरा देत एकमताने योग्य तो उमेदवार देऊ आणि यावेळी दौंडमध्ये परिवर्तन घडवूच, असे प्रतिपादन केले.

यावेळी राजेंद्र पांढरे, तुषार ताकवणे, स्वप्निल शिंदे, विजय कड, यश जेधे, सचिन दिवेकर, अक्षय दिवेकर, राकेश शेळके, शुभम गायकवाड आदी उपस्थित होते.

“दिग्विजय जेधेंनी केलेली ही मेहनत आणि पक्षाच्या प्रचाराचे लोकांत जाऊन केलेले काम कौतुकास्पद आहे. आता लोकसभेप्रमाणे आपल्याला विधानसभेलाही तुतारीच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारालाच विजयी करायचे आहे. दौंडमध्ये यंदा बदल घडवायचा आहे.”

 

– शरद पवार, अध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button