Uncategorized

उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न..

उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न..

उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न...

उदगीर प्रतिनिधी:

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते दिनांक ४ सप्टेंबर रोजी लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, आ.विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांचीही उपस्थिती होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली व नंतर उपस्थित बौद्ध भिक्कूना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान करण्यात आले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली, ना.क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. उदगीर येथील नवनिर्मित बुद्ध विहार हे कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे.हया विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपा प्रमाणे करण्यात आली आहे. हे बुद्ध विहार एक हेक्टर १५ आर जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देश विदेशातून भिक्कू आले होते. त्या बरोबरच उदयगिरी महाविद्यालय येथे महीला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास महिलांचा प्रचंड प्रमाणात सहभाग दिसून आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मंत्री रामदास आठवले,आ. विक्रम काळे, लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन,महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे सर्व या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांवर पुष्प वृष्टी करताना दिसून आले. तसेच या लोकार्पण सोहळा व महीला सक्षमीकरण मेळावा सुरळीत रीत्या पार पडावा यासाठी मेहनत घेणाऱ्या शासकीय अधिकारी व निमशासकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे ही सर्व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button