सर्व प्रथम जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करा- डॉ विठ्ठल लहाने.
सर्व प्रथम जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करा- डॉ विठ्ठल लहाने.
स्पर्धेच्या युगात वावरत असताना सर्व प्रथम जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करा- डॉ विठ्ठल लहाने.
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील
डिगोळ येथे गणेशोत्सवानिमित्त जय भवानी जय शिवाजी गणेश मंडळ डिगोळ यांच्या वतीने जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन मा.श्री. विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावातील सर्व ग्रामस्थ यासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी डॉ.विठ्ठल लहाने जनतेशी संवाद साधत असताना बोलत होते की आपण निवडलेल्या भविष्य उज्वल करण्याच्या वाटचालीवर माणसाने मेहनत घेतल्यास त्यात यश नक्कीच मिळते. व त्यासाठी योग्य मार्गदर्शन, मेहणती मधील सातत्य , आत्मविश्वास, वचनबद्धता हे यशाचे पासवर्ड आहेत. त्या बरोबरच मुलांवर चांगल्या गोष्टी बिंबविल्या पाहिजेत असे प्रतिपादन प्रसिद्ध सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले. तर व्याख्यान कार्यक्रमाचा श्रीगणेशा छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्प अर्पण व अभिवादन करून करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास डिगोळ पंचक्रोशीतील जनतेचा उतस्पूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, उद्योजक उदय देशपांडे, बाबुराव बोरोळे,वैजनाथ बावगे, सिध्देश्वर कोटे, रामदास एकुर्के, इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल दासरे, उध्दव जाजुर्णे, रमाकांत बिरादार, राम बिरादार, अण्णासाहेब पाटील, महेश पाटील, धनराज चावरे,महादेव कोटे, नागनाथ कोटे, चंद्रशेखर बावगे, बस्वराज बावगे,सुशिल बिरादार, दिनकर टाकळगावे,आर्जुन पाटील,जनक बिरादार, खंडेराव बोयणे, शुभम पाटील, आशिष बिरादार, शिवहार कोटे, गणेश चावरे,अनिकेत बोरोळे, राहुल गांदगे, अक्षय स्वामी, विठ्ठल जाजुर्णे इ. जणांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे युवा नेते रामेश्वर धनराज चावरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन रामदास एकुर्के यांनी केले.