मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हा परिषद येरोळ शाळेस विद्यार्थ्यांमुळेच यश – मु. निचळे डि.एन
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हा परिषद येरोळ शाळेस विद्यार्थ्यांमुळेच यश - मु. निचळे डि.एन
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हा परिषद येरोळ शाळेस विद्यार्थ्यांमुळेच यश – मु. निचळे डि.एन
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:
नितेश झांबरे
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला येरोळ या राज्य शासनाच्या निर्णयानुसार, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हा परिषद शाळा येरोळ या शाळेने सहभाग घेतला होता. या उपक्रमामुळे शिक्षक,पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व सकारात्मक प्रतिसाद देत नेतृत्व करावे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळते. या अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला एक लाख पारितोषिक देण्यात येते त्यात जिल्हा परिषद शाळा येरोळ या शाळेस द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. या अभियानात मिळालेल्या यशाबद्दल कौतुकास्पद उदगार काढत असताना मुख्याध्यापक निचळे डि.एन शाळेतील विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षक वृंद , शालेय व्यवस्थापन समिती, पालक यांचे या यशात मोलाचा वाटा आहे असे दैनिक मराठी वार्ताशी बोलताना म्हणाले. तर यापुढेही शाळेस या सर्वांनी सहकार्य करत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढवावे असे सांगत त्यांचे आभार ही मानले. शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल गावचे सरपंच सुकमारताई लोकरे उपसरपंच सतिष शिंदाळकर, शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी दाडगे, उपाध्यक्ष शिल्पा पाटील शालेय समितीचे सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक श्रीमती शेटे, श्रीमती अंबुलगे, निशा जावरे, ज्येष्ठ शिक्षक नागटिळक, सचिन कांबळे, टी.डि बिरादार, शिक्षक शेख तसेच पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांतर्फे शाळेच्या यशाबद्दल कौतुक करण्यात आले.