एस.बी.आय बँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था लातूर मार्फत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न…
एस.बी.आय बँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था लातूर मार्फत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न...
एस.बी.आय बँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था लातूर मार्फत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न…
लातूर प्रतिनिधि :
भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लातूर च्या वतीने मौजे खरोळा ता.रेणापूर जि.लातूर सहा दिवसांच्या उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षनाचा निरोप समारंभ संपन्न झाला.मनरेगा जॉब कार्ड धारक तसेच बचत गटातील महिला अशा एकूण 35 व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला .या सहा दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना बँकिंग क्षेत्र,विविध प्रकारच्या कर्ज योजना,प्रकल्प अहवाल,विविध बिझनेस गेम,मार्केटिंग मॅनेजमेंट तसेच उद्योजकीय सक्षमता याचा समावेश होता. व्यक्तिमत्व विकास करून वेळेचे योग्य नियोजन करून यशस्वी उद्योजक कसे बनावे याचे उत्कृष्ट पद्धतीचे प्रशिक्षण श्री.सुधाकर सुतार यांनी दिले.
या निरोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरोळा गावचे सन्माननीय सरपंच श्री.धनंजय भैया देशमुख साहेब यांनी सर्वांना उद्योजक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व प्रमुख अतिथी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री.जवाहार पाटील साहेब यांनी बँकेची कार्यप्रणाली सांगून कर्जाची माहिती दिली .तसेच माजी सभापती श्री.शिवराज सपताळ साहेब उपसरपंच श्री.इनायत अली शेख साहेब ,ग्रामसेवक श्री.अंकुश वाड साहेब,एस बी आय आरसेटी लातूर येथील फॅकल्टी श्री.सुधाकर सुतार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुधाकर सुतार यांनी केले यामध्ये त्यांनी विविध प्रशिक्षणाची माहिती सांगून नियम व अटी सांगितल्या तसेच यशस्वी उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करावी असे सांगितले.वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.या निरोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनुजा गिरी यांनी केले.श्रीधर गिरी व कल्पना तत्तापुरे प्रशिक्षणार्थी यांनी मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन सौ सुवर्णा खंडापुरे यांनी केले.