Uncategorized

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन
———
टेंभू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
———
⁠टेंभू योजनेला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर

सांगली, दि. १ : टेंभू विस्तारित प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेस दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील तीन घटक कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूमिपूजनानंतर विटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभू योजनापूर्तीसाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे त्या क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

आज भूमिपूजन झालेल्या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारित प्रकल्पातील सांगली जिल्ह्यातील टप्पा क्र. 6, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्र. 5 वितरण व्यवस्था व कामथ गुरूत्व नलिका यांचा समावेश आहे.

भूमिपूजनापूर्वी खानापूर तासगाव कालवा, सुळेवाडी (विटा) (ता. खानापूर) येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, सुहास बाबर, अमोल बाबर आदि उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू विस्तारित प्रकल्पांतील विविध कामांची छायाचित्रातून माहिती घेतली.

भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाविषयी…

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या रु.7,370.03 कोटी रकमेच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय अहवालास महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जानेवारी रोजी मान्यता दिलेली आहे.

मूळ टेंभू योजनेतील सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगांव व कवठेमहांकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या सात तालुक्यातील 240 गावांतील 80,472 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मितीचे काम पूर्णत्वास आले आहे. या करिता 22.00 अ.घ.फू. इतका पाणी वापर होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button