Uncategorized

तहसिल कार्यालया समोर निळकंठ बिरादार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला तालुकास्तरीय यश

तहसिल कार्यालया समोर निळकंठ बिरादार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला तालुकास्तरीय यश

तहसिल कार्यालया समोर निळकंठ बिरादार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला तालुकास्तरीय यश

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि :

नितेश झांबरे

निलंगा विधानसभा मतदार संघातील देवणी येथे गेल्या ३ ऑक्टोबर २०२४ पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात श्री. निळकंठ बिरादार तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना हे तहसील कार्यालय देवणी येथे आमरण उपोषणास बसले होते .

उपोषणाच्या मागण्या सोयाबीनला प्रति क्विंटल ८००० रु भाव , जिल्ह्यात शेतमाल आधारभूत खरेदी केंद्र चालु करणे , गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाची थकीत एफ.आर.पी, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न , शेतकऱ्यांना रेडीरेकनर प्रमाणे पीक कर्ज मिळावे , पश्चीम महाराष्ट्राप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाडयात सुध्दा भाव द्यावा , चालु वर्षाचा भाव जाहीर केल्याशिवाय कोणत्याही कारखाण्याला गाळप परवाना देऊ नये ई. मागण्या या उपोषणा दरम्यान करण्यात आल्या होत्या. त्याबद्दल तहसिलदार देवणी मा.सोमनाथ माळी यांनी या उपोषणाची दखल घेत विविध खात्यातील प्रमुख अधिकांऱ्याची दि. ७ ऑक्टोबर रोजी देवणी येथील सभागृहामध्ये बैठक बोलावली होती व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करुन त्यांनी तालुका मर्यादित ज्या मागण्या आहेत त्या संबधीत उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले व आपल्या उपोषणातील महत्वाच्या विषयावर जिल्हा अधिकारी लातूर यांच्या सोबत उपोषण कर्ते व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घडवून आणण्यासाठी आश्वासन दिले व लवकरच लातूर जिल्हाधिकारी यांची बैठकीची तारीख आपल्याला कळविले जाईल असे सांगण्यात आले. उपोषण सोडवण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर , युवा आघाडी अध्यक्ष सुधीर बिंदू , लातूर जिल्हाध्यक्ष अशोक पाटील , शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते लक्ष्मण वंगे , दगडूसाहेब पडिले , धाराशिव जिल्हा अध्यक्ष नवनाथ जाधवर , सोमनाथ नागुरे , शिवाजी काळे , श्रीकृष्ण चाटे , देवणीचे तहसीलदार सोमनाथ माळी , देवणी पोलिस स्टेशनचे पोलिस इन्सपेक्टर डोके , परमेश्वर माणकेश्वरे, आदी मान्यवर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ पाणी देवून श्री.निळकंठ बिरादार यांचे उपोषण सोडवण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button