संभाजी ब्रिगेडचा ‘लोकशाही जागर मेळावा’
लोकशाही वाचविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे.प्रा.शिवानंद भानुसे यांचे आवाहन
लोकशाही वाचविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे.प्रा.शिवानंद भानुसे यांचे आवाहन
संभाजी ब्रिगेडचा ‘लोकशाही जागर मेळावा’
मंगरुळपीर (दि.११): लोकशाही वाचविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा.शिवानंद भानुसे यांनी दि.१० रोजी मंगरुळपीर येथे संभाजी ब्रिगेड द्वारा आयोजित ‘लोकशाही जागर मेळाव्या’त केले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, डॉ.सिद्धार्थ देवळे, प्रा.चांगदेव शिंदे, गणेश सुर्वे, सचिन परळीकर, गोपाल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे भानुसे म्हणाले की, सद्यस्थितीत देशात संविधान धोक्यात असून, हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. या देशाला खोटारडा, अशिक्षित आणि अवैज्ञानिक प्रधानमंत्री मिळाल्यामुळे देशाची वाट लागत आहे. संविधान अर्थात लोकशाही धोक्यात आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचे, खोक्याचे, दादागिरीचे व दमदाठीचे, केसेस भरण्याचे घाणेरडे असे राजकारण सुरू असून मुस्कटदाबी सुरू आहे. महागाई, बेकारीने उच्चांक गाठला आहे. देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन भानुसे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन व्यवहारे, अजय गवारगुरु, रमेश मुंजे, बंडू भगत, देवेंद्र खिराडे, काझी नझीरुद्दीन, श्रीकृष्ण भरदूक, डॉ.जयंत गोतरकर, वसंत मोरे, योगेश सुडके, प्रथमेश तायडे, दळवी, विजू खैरकार आदींनी परिश्रम घेतले.
तालुका प्रतिनिधी मंगरुळपीर
गजानन व्यवहारे