Uncategorized

जिल्हा परिषद प्रशाला येरोळ येथील शिक्षक शिवाजी बिरादार यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न… 

जिल्हा परिषद प्रशाला येरोळ येथील शिक्षक शिवाजी बिरादार यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न... 

जिल्हा परिषद प्रशाला येरोळ येथील शिक्षक शिवाजी बिरादार यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न…

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:

नितेश झांबरे

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील जिल्हा परिषद प्रशाला मधील सहशिक्षक शिवाजी नरसिंगराव बिरादार हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले .त्या निमित्ताने वार गुरुवार या २४ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्रशालेत सेवा निवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन पुष्प अर्पण करुन करण्यात आली.या सेवा निवृत्ती कार्यक्रमात गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी बिरादार व महानंदा बिरादार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी दाडगे महाराज हे होते. यावेळी व्यासपीठावर लातूर एस.एस.सी बोर्ड सदस्य प्राचार्य रामलिंग मुळे, केंद्र प्रमुख दामाजी बालुरे, शिवाजी एरंडे,मुख्याध्यापक ईश्वर बिराजदार, येरोळ गावचे सरपंच सुकुमारताई लोकरे, पञकार शिवानंद भुसारे, शिक्षक हामीद शेख, प्रकाश नागटीळक,माधव बिरादार, बोरोळ शाळेचे मुख्याध्यापक राठोड गुरुजी, तुळशीदास बिरादार,अरुण बिरादार, माणिक बनसोडे,बिरादार एस. एन,स्वामी जे.एस, सुर्यवंशी डी.पी, सचिन कांबळे,जावरे एन , प्रभाकर चोचंडे, विकास बिरादार,धीरज बिरादार, नागनाथ आवाळे, बस्वराज धोञे,मनोज साकोळकर,यांच्या सह तळेगाव केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, नातेवाईक,मिञ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हामीद शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश नागटिळक यांनी केले उपस्थितांचे आभार एम.एस बिरादार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button