Uncategorized

निलंगा विधानसभा मतदार संघातून ‘परिवर्तन महाशक्ती’ ची उमेदवारी लक्ष्मण वंगे यांना जाहीर.

निलंगा विधानसभा मतदार संघातून 'परिवर्तन महाशक्ती' ची उमेदवारी लक्ष्मण वंगे यांना जाहीर.

निलंगा विधानसभा मतदार संघातून ‘परिवर्तन महाशक्ती’ ची उमेदवारी लक्ष्मण वंगे यांना जाहीर…

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि :

नितेश झांबरे

शेतकरी संघटनेचे नेते युगात्मा शरद जोशी यांच्यासोबत काम केलेले तात्विक नेते तसेच शेतकरी चळवळीसाठी लढा देणारे लक्ष्मण वंगे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्तीची उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वतंत्र भारत पक्षाकडून ते निलंग्याच्या मैदानात उतरत असून शुक्रवारी पुणे येथे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट व स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सीमाताई नरोडे यांनी वंगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत १९८० पासून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून लक्ष्मण वंगे यांनी लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी चळवळ वाढविली. ऊस दराचे आंदोलन, काळी ज्वारी खरेदी करण्यासाठीचे आंदोलन या आंदोलनांसह मराठवाड्यात तसेच लातूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीन उत्पादन करण्यासाठी चळवळ राबवणारे वंगे हे शेतकरी संघटनेचे या भागातील एकमेव नेते आहेत. लातूर जिल्ह्यात आज जे सोयाबीनचे नगदी पीक म्हणून घेतले जाते, त्यासाठी वंगे व त्यावेळच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम मैलाचा दगड ठरले

आहे. शेतकरी संघटनेच्या उद्योजक आघाडीचे नेतृत्व करताना वंगे यांनी लातूर तसेच मराठवाड्यात नगदी पीक आल्याशिवाय शेतीत भरभराट होणार नाही, हे हेरून

सोयाबीन उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली, चळवळ निर्माण केली. कोणत्याही उद्योजकाने त्याकाळी धाडस केले नसताना वंगे यांनी स्वतःची ५० एकर जमीन विकून सोयाबीनचा प्लांट सुरू केला. लातूर येथे तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या उपस्थितीत संघटनेचा मोठा कार्यक्रम घेतला. नंतरच्या काळात राष्ट्रीय स्तरावर शेतकरी संघटनांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांच्यासोबत आंदोलनात सहभाग, शेतकरी संघटनेच्या हमीभाव मागणीच्या आंदोलनात तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठीच्या आंदोलनात वंगे हे सातत्याने आघाडीवर राहिले. त्यांच्या उमेदवारीने निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यात उत्साह संचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button