प्रहारच्या पाठींब्याने अपक्ष उमेदवार भाविक भगत यांचे हात होणार बळकट?
प्रहारच्या पाठींब्याने अपक्ष उमेदवार भाविक भगत यांचे हात होणार बळकट?
प्रहारच्या पाठींब्याने अपक्ष उमेदवार भाविक भगत यांचे हात होणार बळकट?
महागाव- उमरखेड विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भाविक नगत यांना यांना आरोग्य सेवक म्हणून मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा जाहीर झाला झाल्याने भाविक भगत यांचे हात बळकट झाले आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे असलेले भाविक दिनाजी भगत यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यात भाविक भगत फाउंडेशन द्वारे अनेक गरजू लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले आहे. महागांव-उमरखेड विधानसमा मतदार संघात तळागाळातील गोरगरिबांची सेवा करून आरोग्यदूत म्हणून नाव कमवणार्या फक्त एक अपक्ष उमेदवारांसाठी निस्वार्थ भावाने व
स्वतःच्या घरची भाकरी खाऊन प्रचार करणारी प्रचार टीम सज्ज झाली आहे. भाविक भगत हे सफरचंद या निवडणूक निशाणीवर निवडणूक लढवीत आहेत. आपण केलेल्या समाजकार्याचे फळ कोठे ना कुठे मतदार मतदानाच्या रूपाने निश्चित फेडणारच आहेत, अशा पद्धतीच्या भाविक भगत यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळे त्यांना मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळत असून यातच भारीस भर म्हणून दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी प्रहार जन शक्ती पक्षाच्या कार्यकर्तयांनी पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला असल्याचे अमोल आवटे उप जिल्हाप्रमुख यांनी म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चुभाऊ कडू यांचे आदेशान्वये महागाव उमरखेड
विधानसभा क्षेत्रात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे भाविक दिनाजी भगत यांना
आपल्या प्रहार जनशती पक्षाचा जाहीर पाठिंबा दर्शविला असून प्रहार जनशक्ती पक्षाची टीम ही यावेळी प्रचारामध्ये सहभागी होत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.