रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. या मतदार संघात नेहमी झनक कुटुंबाचं वजन असल्याचं दिसतंय
रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. या मतदार संघात नेहमी झनक कुटुंबाचं वजन असल्याचं दिसतंय
वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. या मतदार संघात नेहमी झनक कुटुंबाचं वजन असल्याचं दिसतंय.
मात्र त्यांच्या याच मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस नेते असलेले आणि काँग्रेस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले अनंतराव देशमुख हे झनक कुटुंबीयांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात. कारण काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी अनंतराव यांनी मोठे प्रयत्न केले असल्याचं अनेक वेळा उघड झालं असून पक्षाने त्यांचं निलंबनसुद्धा केलं होतं. त्यामुळे झनक देशमुखांचं
एकाच पक्षात राहून दोन्ही कुटुंबीयांचं केव्हाच जमलं नाही. त्याची उघड सुरवात झाली ती 2009 च्या निवडणुकीपासून. काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार सुभाष झनक यांच्या विरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत देशमुख यांचा पराभव झाला. हे वैर इथंच संपलं नाही तर हे वैर 2019 च्या निवडणुकीत पुन्हा पहायला मिळालं. अमित झनक यांच्या विरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अमित झनक यांचा अवघ्या 2100 मतांनी निसटता विजय झाला.
काँग्रेसला कायमचा रामराम करत देशमुख पिता-पुत्रांनी 2022 मध्ये भाजपमध्ये पिता-पुत्रांनी प्रवेश केला. त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं इथेही झालं नाही. महायुतीमध्ये ही रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे केली आणि ऐनवेळी भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. काँग्रेसकडून अमित झनक, महायुतीकडून भावना गवळी तर अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघात चुरस होण्याची शक्यता आहे.
सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि नव्याने रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. रिसोड विधानसभा मतदारसंघात सुभाष झनक हे 51,234 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीनंतर सुभाष झनक यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यांना महिला व बालकल्याणमंत्री पद मिळालं. .मात्र आदर्श घोटाळा उघड झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावं लागल. यानंतर काहीच महिन्यानंतर सुभाष झनक याचं निधन झालं.
लोकसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूक झाली आणि त्यामध्ये अमित झनक यांनी 73,016 मते घेत विजयी झाले. 2014 साली काँग्रेसने मोदी लाटेत पण अस्तित्व टिकवत आपला गड कायम ठेवला आणि अमित झनक 70,939 मतं मिळवत विजयी झाले.
सन 2019 साली रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने मोदी लाटेतदेखील अस्तित्व टिकवत आपला गड कायम ठेवला. इथं अमित झनक 69875 मतं मिळवत विजयी झाले. मात्र 2019 च्या तुलनेत आता मोठे बदल झाले. भावना गवळी या प्रथमच त्यांची जन्मभूमी असलेल्या रिसोड मतदारसंघात विधानसभा लढवत आहेत. तर अनंतराव देशमुख हे वयाच्या 76 व्या वर्षी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसची पकड आणि जातीय फॅक्टरमुळे अमित झनक याना पसंती दिसते. त्यामुळे काट्याची लढत असलेल्या या मतदारसंघात मतदार नेमका कौल कुणाला देतात ते निकालावेळी स्पष्ट होईल….रिसोड शहर प्रतिनिधी धनंजय माळेकर महाराष्ट्र मीडिया न्यूज अॅण्ड एन्टरटेनमेंट रिसोड