Uncategorized

कीनवट- माहूर विधानसभा क्षेत्रात आले निवडणूक प्रचाराला वेग

कीनवट- माहूर विधानसभा क्षेत्रात आले निवडणूक प्रचाराला वेग

कीनवट- माहूर विधानसभा क्षेत्रात आले निवडणूक प्रचाराला वेग

 

सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत किनवट विधानसभा क्षेत्रात आपले कामे करण्यासाठी व मतदान वाढविण्यासाठी जास्तीत-जास्त कार्यकर्ते गोळा करण्याकडे उमेदवारांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.

कोणतीही निवडणूक म्हटलं, की पाठीशी कार्यकर्ते लागणारच. निष्ठावंत व निवडणुकीपुरते काम करणाऱ्या कार्यकत्यांकडे राजकीय नेत्यांचा डोळा असतो. सध्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले काम करण्यासाठी जास्तीत-जास्त कार्यकर्ते गोळा करण्याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे कार्यकत्यांनाही आता सुगीचे दिवस आले आहेत. किनवट माहूर हा विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील शेवटचा मतदारसंघ आहे.या निवडणुकीतून करोडो रुपयांची उलाढाल होत असते, असा आजवरचा अनुभव आहे.

या मतदारसंघात एक पंचवर्ष वगळता पंधरावर्षापासून राष्ट्रवादीचे पक्षांचे प्रबळ अस्तित्व होते पण मागच्या पाच वर्षात शिवसंग्रामनी भाजपची निशाणी वापरून हि जागा राखली होती.

परंतू ज्या-ज्या विचारधारांसाठी राजकीय पक्ष स्थापन झाले आहेत, त्या विचारांचे मतदारसुद्धा या मतदारसंघात आहेत. अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विखुरलेले होते; मात्र आता निवडणुकीचा प्रचार सुरु होताच हळूहळू कार्यकर्त्यांतही जोश निर्माण होत असताना दिसत आहे. कार्यकत्यांवर निवडणुकीची भिस्त असल्याने राजकीय नेते कार्यकर्त्यांना महत्त्व देऊन आखाड्यात उतरवत आहेत.

जवळपास मतदान होईपर्यंत हा निवडणुकीचा काळ असतो. या काळामध्ये कार्यकत्यांची सर्व सोय होणार आहे. त्यामुळे किनवट – माहूर तालुक्यातील बरेच हॉटेल, धाबे, बिअर बार हाउसफुल्ल असल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांना सोनेरी दिवस आले असून, निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये होणार असल्याने उमेदवारास तिन्ही पक्षांच्या कार्यकत्यांची सोय करावी लागत आहे.

त्यामुळे निवडणुकांपेक्षा कार्यकर्त्यांवरील खर्चाचा आर्थिक बोजा उमेदवारांवर पडत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

परंतू बरेच वर्षापासून जनतेच्या संपर्कात राहणारे सचिन नाईक यांनी अपक्ष फार्म भरल्यामुळे मतदार संघात खळबळ उडाली आहेत.तसेच वंचीत बहुजन आघाडीकडून डॉ. आमले बोरगांवकर हे उभे आहे. पण या विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत होईल असा अंदाज वर्तेवीले जाता आहे. पण डॉ. आमले यांचीही पकड चांगलीच असल्याचे बोलले जात आहे. त्यामूळे चौरंगी लढत होणार का? या कडे मतदारांचे लक्ष लागली आहे. सचिन नाईक यांचा ही प्रचार जोरात चालू आहे . सचिन नाईक यांची हवा चांगली असल्याने ते आमदार बनतील? कि त्याचा फायदा महायुती ला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे.

प्रतिनिधी =भारत राठोड महाराष्ट्र मिडीया किनवट नांदेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button