चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर चा भीषण अपघात होऊन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला
चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर चा भीषण अपघात होऊन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला
चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर चा भीषण अपघात होऊन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले चालक संतोष पैठणकर वय 42 वर्ष राहणार वाकद तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे मृतकाचे नाव असून जखमीमध्ये चार महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे सर्व जखमींना वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर घटना रिसोड वाशिम मार्गावर ग्राम वनोजा जवळ दिनांक 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील काही पुरुष व महिला आपल्या मुलांना नवोदय विद्यालय वाशीम येथे सोडण्याकरिता गेले होते सदर विद्यार्थ्यांना सोडून परत येत असताना वनोजाजवळ एका छोट्या नाल्याच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी क्रमांक एम एच 21 बी एफ 0830 असून धडक फुलाच्या कठळ्याला लागली अपघात एवढा भीषण होता की क्रुझर या गाडीमध्ये बसलेले सदर प्रवासी पुरुष महिला हे काच फोडून गाडीच्या समोरील भागावर फेकल्या गेले याप्रकरणी मात्र जखमी बद्दल माहिती मिळू शकली नाही घटनेची माहिती मिळताच वनोजा या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ॲम्बुलन्स बोलवून जखमींना तातडीने वाशिम येथे पाठवले