सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी टाकले खड्ड्यात पुरून, दोघांवर पोलिसांत गुन्हे दाखल
सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी टाकले खड्ड्यात पुरून, दोघांवर पोलिसांत गुन्हे दाखल

सेनगांव तालुक्यातील शेगांव खोडके शिवारात भावानेच मित्राच्या मदतीने सख्या भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेतालगत असलेल्या ओढ्यात खड्डा करून पुरून टाकल्याची खळबळ जनक घटना घडली असून याप्रकरणी मयताचा भाऊ हरिभाऊ किसन खोडके व पवन धोंडू आखाडे या दोघांवर गोरेगांव पोलीस ठाण्यात दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजून 44 मिनिटाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करण्यात आलेल्या मयत तरुणाचे नाव शिवाजी किसन घोडके असून त्यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान शेगांव खोडके शिवारात गळा दाबून व गळ्यावर दगडाने मारून जखमी करून आरोपींनी खून केल्यची फिर्यादी नारायण नामदेव खोडके यांनी दिल्यावरून आरपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणातील आरोपींनी मयताची सर्व जमीन मला मिळावी व सततच अपमान करतो या कारणावरून सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.