चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथे निशुल्क नेत्र तपासणी
चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथे निशुल्क नेत्र तपासणी

चित्रऋषी वृद्धाश्रम तुळजापूर येथे निशुल्क नेत्र तपासणी
वाघमारे नेञ रुग्नालयाच्या वर्धापण दिनाच्या औचित्याने ऊपक्रम
मंगरूळपीर ता 19
मंगरूळपीर शहरालगत असलेले चित्रऋषी महाराज,मूकबधिर व दिव्यांग निवासी विद्यालय तुळजापूर, येथे दि 18 रोजी नेत्रतज्ञ डॉ. अजय वाघमारे यांनी वाघमारे नेत्रालय वर्धापन दिनानिमित्त वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध व विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे डोळ्यांची तपासणी मोफत केली आहे.
डॉक्टर अजय वाघमारे यांच्यामार्फत वयोवृद्धांना व विद्यार्थ्यांना मोफत डोळ्यांसाठी उपयुक्त चष्मे व वृद्धांना निशुल्क नेत्र शस्त्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री बी पी राठोड यांची उपस्थिती लाभली होती सोबत विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डॉ.वाघमारे यांनी त्यांच्या चमूने वृद्धाश्रमातील व विद्यालयातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता चित्रऋषी वृद्धाश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता