मंगरूळपीर येथे 78 वा होमगार्ड दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…
मंगरूळपीर येथे 78 वा होमगार्ड दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

… मंगरूळपीर …प्रतिनिधी….
मंगरूळपीर:- मंगरूळपीर येथे महाराष्ट्र होमगार्ड यांचा 78वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात होमगार्ड ग्राउंड महात्मा फुले चौक येथील होमगार्ड ग्राउंड मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला या कार्यक्रमाला सकाळी होमगार्ड कार्यालय मध्ये सकाळी सात वाजता माझी तालुका समादेशक मधुकरराव देशमुख यांनी झेंडावंदन व रॅलीला हिरवी झेंडे देऊन होमगार्ड सैनिक यांनी मंगरूळपिर शहरांमध्ये आंबेडकर चौक ,पासून बिरबलनाथ चौक ,व्हिडिओ चौक, अकोला चौक, आंबेडकर चौक मार्गे येथे राहिला रॅलीला समाप्त करण्यात आले.
तसेच मंगरूळपीर मधील होमगार्ड ग्राउंड येथे कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित मंगरूळपीर वाशिम आमदार श्याम चरण खोडे हजर होते तसेच भारतीय जनता पार्टी यांचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे व पंचायत समिती सदस्य सचिन राऊत व सरपंच संघटना विभागीय अध्यक्ष ( अजित पवार गट) चंद्रकांत पाक धने हजार होते तसेच मंगरूळपीर येथील जेष्ठ पत्रकार वीरेंद्र सिंग ठाकूर हे पण उपस्थित होते येथील पत्रकार नारायण आव्हाळे हे देखील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांनी मंगरूळपीर पथकामधील होमगार्ड सैनिक यांना संबोधित करताना श्याम चरण खोडे आमदार यांनी सांगितले की होमगार्ड सैनिका बद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी माहिती दिली की होमगार्ड अतिशय कर्तव्यदक्ष व पोलिसाला खांद्याला खांदा लावून काम करण्यास सक्षम असतो. व होमगार्ड यांनी आपले कर्तव्य चोख पणे पार पाडावे व आपला युनिफॉर्म व स्वच्छ असावा. मंगरूळपीर येथे गेल्या अनेक दिवसांपासून होमगार्ड ग्राउंड मध्ये होमगार्ड पथकामध्ये होमगार्डला स्वतंत्र कार्यालय तसेच शौचालय व होमगार्ड ग्राउंड ला तार कंपाऊंड आम्ही उपलब्ध करून देऊ तसेच आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यामधील होमगार्ड सैनिकांना 670 वरून 1283 रुपये सैनिकांचे मानधन वाढविले तसेच महायुतीच्या सरकारमध्ये होमगार्डला येत्या काही दिवसांमध्ये 365 दिवस रोजगार देण्याचे नवनिर्वाचित आमदार श्याम चरणजी घोडे यांनी होमगार्डला सांगितले व मग कारंजा व रिसोड येथे स्वतंत्र नवीन पथक तयार करून मिळेल असेही शाम चरण खोडे यांनी होमगार्डला माहिती दिली. या कार्यक्रमाला मंगरूळपिर येथील प्रभारी समादेशक तसेच शेषराव खोडके यांनी प्रास्ताविक भाषण केले व सूत्रसंचालन पलटण नायक सुषमा कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन गवार गुरु यांनी केले. या कार्यक्रमाला मंगरूळपीर येथील महाराष्ट्र भूषण आयकॉन अवॉर्ड पत्रकार फुलचंद भगत यांचे मंगरूळपीर पथकाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पथकामधील मोलाचे सहकार्य कंपनी कमांडर अमोल सुरोशे, कृष्ण पन्नासे, रुपेश करपे, राजूभाऊ गजभार, सतीश घुले, गजानन भोयर, संतोष गावंडे,, संतोष चौधरी, रमजान पप्पू वाले, अन्सार नवरंगवादी, महबूब नरंगाबादी, संतोष ठाकरे, महबूब शेख , उजेस भगत,फिरोज भुरीवले, तानाजी शिंदे, मयूर मनवर, सुनील जाधव नदीम हिरे वाले, रहीम कालीवाले ,रमजान घोची वाले, गोपाल भोयर, उस्मान पटेल ,मोहम्मद तवकीर, रशीद शेख, अमोल भगत, फारुख बेनीवाले बालाजी घुसे , असलम बेनीवाले,,होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…