गोरशिकवाडीच्या पुढाकाराने केले गोरधाटीतून लग्न
गोरशिकवाडीच्या पुढाकाराने केले गोरधाटीतून लग्न

गोरशिकवाडीच्या पुढाकाराने केले गोरधाटीतून लग्न
(प्रेरणा व आकाशने समाजाला दिले नवे संदेश)
मराठवाडा व विदर्भाच्या पैनगंगेच्या तिरावर सेवानगर ( कासारबेहळ ) ता. महागाव येथील एका छोट्यास्या तांड्या मध्ये प्रेरणा व आकाश व आर्णी तालुक्यातील बोरगांव (धा) यांनी गोरशिकवाडी च्या पूढाकाराने गोर बंजारा समाजाच्या रूढी पंरपरेनुसार लग्न करून समाजाला नवी दिशा देण्याचे धाडस केले आहे. बंजारा हा समाज प्राचिन न काळापासून देशात राहतो बंजारा समाजाच्या रूढी पंरपरा व त्यांच्या त्योहाराच्या गितातून निसर्ग पूजक व अंधश्रध्देला बळी न पडणारा समाज असल्याचे समजते. पण बदलत्या युगात बंजारा समाजच नव्हे तर कित्येक बहुजन हा अंधश्रद्धेला बळी पडत आहे. ही बाब गोरशिकवाडी या सामाजीक चळवळीच्या लक्षात आली आणि गोर शिकवाडीने पूढाकार घेतल्याने आकाश व प्रेरणाने बंजारा समाजाच्या
घाटीनुसार लग्न करण्याचे ठरवले. बंजारा समाजाची जुनी लग्न करण्याची परंपरा बदलत्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या बंजारा समाजात जुन्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणाला न बोलावता आपल्या समाजातील लग्न लावणाऱ्या व्यक्तीला बोलावून
कमी खर्चात लग्न समारंभआटोपायचे. परंतु आज घडीला समाजात अंधश्रद्धेला बळी पडून मुहूर्त काढत आहे. पण मुहूर्तावर कोणीच लग्न करत नाहीत. कोणत्याही भोंदू महाराजाचे ऐकून लग्नानंतर पूजा करणे असे कित्येक अंधश्रद्धा समाजात पसरली असून ही अंधश्रद्धा कशी दूर करायची
ह्याच हेतूने प्रेरणा व आकाशने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. बंजारा समाजात चंद्र सूर्य आणि निसर्गाची पूजा करून लग्न समारंभाला सुरुवात करत असे त्याच पद्धतीने आकाश व प्रेरणानेही चंद्र सूर्य आणि निसर्गाची पूजा करूनच सोटा मूसळला फेरे घेऊन लग्न केले आहे. बंजारा समाजात सोटा (वाटणी) मूसळला चंद्र आणि सूर्याचे प्रतीक मानले जाते. या लग्न समारंभात संत सेवालाल महाराज वसंतरावजी नायक व काशिनाथ नायक’ यांना नायक कारभारी च्या हस्ते भोग लावून लग्न कार्याला सुरुवात केले. या गोर घाटीच्या लग्नात डीजे बँड व फटाक्याचे प्रदूशन टाळण्यासाठी डफडाच्या
तालावर बंजारा पध्दतीने ढावलो बोलून लग्न पार पडले. लग्नसोहळा अनिलभिया बाळोंत यांनी लावले तर राजकूमार जाधव यांनी जिवणभर सोबत राहण्यासाठी शपथ घ्यायला लावले. या वेळी. दोन्ही तांड्याचे नायक, कारभारी’ डावो गेरीया’ गोरसेनेचे अर्जून विसळावत’ माजी जि.प सदस्य बि.एन. चव्हाण, मा. सभापती डी. बि. नायक’प.स. सदस्य संदीप ठाकरे, मोहनरावजी कऱ्हे. करंजखेडचे भरोष चव्हाण, राजूभाऊ राठोड सह गावकरी व पाहूणे मंडळी हजर होते. अशाच गोरधघाटी नुसार लग्न करून समाजाला अंधश्रध्देतून मुक्त करावे असे या वेळी नवरीचे आजोबा उत्तम नायक यांनी सांगितले.
महाराष्ट्र मिडीया प्रतिनिधी – भारत राठोड किनवट