मंगरूळपीर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी
मंगरूळपीर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी

मंगरूळपीर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी
मंगरूळपीर (दि.१०) तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र मीडिया:
आज चैत्र शुद्ध त्रयोदशी जैन धर्मातील अंतिम २४ वे तीर्थंकर भगवान महावीरांची जयंती दि.१० रोजी सकाळी १० वाजता भक्ती भावाने उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व प्रथम आदिनाथ दिगंबर जैन मंदीरात जन्माभिषेक करुन ध्वजारोहण करण्यात आले व नंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व जैन श्रावक श्राविका व लहान मुलं खूप उत्साहाने सामील झाली होती.
नंतर मंदिरात विद्यमान आमदार शाम खोडे व उपस्थित मान्यवरांचे मंदीराच्या विश्वस्त मंडळाकडून स्वागत केले गेले. यावेळी पुरुषोत्तम चितलांगे, विरेंद्र सिंग ठाकूर, सुनील मालपाणी, डॉ. कौस्तुभ रत्नपारखी, सतिष हिवरकर, अभिषेक दंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नंतर स्वागत गित सौ. ज्योती ताई फुरसूले व सौ. पल्लवी होटे यांनी सादर केले
आणि धर्मकार्यामध्ये अग्रभागी असणाऱ्या श्राविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजेश येळवणकर यांनी केले.
यावेळी दिगंबर जैन नवयुवक मंडळाने भरपूर परिश्रम घेतले. भगवंताच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक मंडळ नरेंद्र येळवणकर, सागर होटे, हर्षद हीवसे, अनुप हीवसे, सुयोग्य मांडगे, किशोर डावरे, ऋषभ येळवणकर, बालू डावरे, शेखर सावजी, नितीन हिवसे, सुधीर होटे, प्रवीण होटे, राजुसेठ बरछा, बालू डाखोरे, जुटावत, शाश्वत येळवणकर व जैन महिला मंडळ आदींनी पुढाकार घेतला होता.