चाकण मधील कचरा समस्या येथील कचरा डेपो बंद झाला आहे त्यामुळे तेथील अनाधिकृत कचरा डेपो बंद असल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहे
चाकण मधील कचरा समस्या वाढली

राजगुरुनगर :- चाकण मधील कचरा समस्या येथील कचरा डेपो बंद झाला आहे त्यामुळे तेथील अनाधिकृत कचरा डेपो बंद असल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहे त्यासाठी कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो कायमचा मार्गी लावण्यासाठी खेडचे आमदार माननीय बाबाजी काळे आश्वासन दिले आहे.
चाकण शहरा मधील कचरा जागोजागी व घरात सडू लागल्या आहे येथील नागरिकांना आरोग्याला सामोरे जावे लागते कचऱ्यामुळे वृद्ध व्यक्ती यांना गंभीर आजार सुरू झाले. लहान मुले ,व महिलाचे आरोग्य प्रश्न निर्माण झाले ला आहे त्यांना होणारा आजार अतिशय गंभीर होऊ शकतात खराबवाडी हद्दीतील खाजगी जागेची दगड खाणीत चाकण शहराचा कचरा टाकला जात होता. परंतु जागा मालकाने. आपल्या हद्दी मध्ये कचरा टाकण्यास नगरपरिषदेला नकार दिला आहे . कचऱ्याचे मोठमोठे ढीग तेथे साचले . स्थानिक अधिकारी पोलीस यंत्रणा कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या स्थानिक जनतेवर दबाव आणून जनआंदोलन चिरडून कायद्याचा धाक देऊन अरेरावी करत होते
आमदार बाबाजी शेठ काळे यांनी तातडीने तोडगा काढण्यासाठी बिरदवडी ग्रामस्थांची चर्चा केली. ग्रामस्थांना कचऱ्यापासून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी तेथील कचरा डेपो या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात येईल पर्यायी जागा शोध घेण्यात येईल कुठेही अडचणी येणार नाही असे सांगण्यात आले. याप्रसंगी उद्योजक शैलेश फडके, काळूराम जाधव, संदीप जाधव, अमोल परदेशी, सुनील काळ डोके, राहुल जाधव राहुल जाधव, शुभम पवार यांच्या उपस्थितीमध्ये बिरदवडी ग्रामस्थांशी आमदार बाबाजी शेठ काळे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली